Adenovirus: लहान मुलांमध्ये इक्युट हिपॅटायटीसचा (Acute Hepatitis) उद्रेक होत असल्याचा प्रकार अनेक देशांमध्ये समोर येत आहे. या घातक आजाराने आतापर्यंत डझनहून अधिक लहान मुलांचा बळी घेतला आहे. काही मुलांना यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते आहे. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. सर्दीसह रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या या एडोनो विषाणूच्या (Adenovirus) या श्रेणीवर तज्ज्ञ संशोधन करत आहेत.


युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन, उत्तर आयर्लंड, स्पेन, इस्रायल, अमेरिका, डेन्मार्क, नेदरलँड्स, इटली, नॉर्वे, फ्रांस, रोमानिया आणि बेल्जियममध्ये या आजाराची प्रेकारणे नोंदवली गेली आहेत.


कुठे आढळला ‘हा’ आजार?


ऑक्टोबर 2021मध्ये अमेरिकीतील अलबामा रुग्णालयात पाच लहान मुलांना यकृत निकामी झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते. याचे कारण मात्र समोर आले नव्हते. यानंतर महिन्याच्या सुरुवातीला, WHOला स्कॉटलँडमधील 10 मुलांना देखील असाच आजार झाल्याची माहिती मिळाली. तीन दिवसांनंतर युकेमध्ये देखील या आजाराची 74 प्रकरणे नोंदवली गेली. आतापर्यंत एकूण 169 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


WHOने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या आजाराचे कारण समजण्याआधी आणखी नवे रुग्ण सापडतील, अशी भीती आहे. यासाठी विशिष्ट नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय लागू केले जाऊ शकतात.’


काय आहेत या आजाराची लक्षणे?


* ओटीपोटात दुखणे


* कावीळ आणि उलट्या-जुलाब होणे


* त्वचा पिवळी पडणे


* डोळे पांढरे होणे


* थकवा


* भूक न लागणे


* लघवीचा रंग गडद होणे


* सांधेदुखी


*यकृताला सूज


ही या आजाराची काही सामान्य लक्षणे आहेत.


आजाराचं नेमकं कारण काय?


या आजाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तज्ज्ञ एडोनो विषाणू आणि संभाव्य धोक्यावर संशोधन करत आहेत. 74 मुलांना एडोनो विषाणूची लागण झाली होती, त्यापैकी काहींना कोरोना देखील झाला होता.


हा आजार हिपॅटायटीसमध्ये असणाऱ्या एडोनो विषाणू संसर्गाचाच परिणाम असल्याचे WHOने म्हटले आहे. हा आजार दुर्मिळ असला, तरी चाचणीनंतर आता अनेक प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर आता या एडोनो विषाणूने डोके वर काढले आहे. यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.


एडोनो विषाणू म्हणजे का?


अमेरिकन सीडीसीच्या मते, एडेनो हा एक सामान्य विषाणू आहे, ज्यामुळे वेगवेगळे रोग होतात. यामध्ये सर्दी, ताप, घसा खवखवणे, खोकला, कफ, न्यूमोनिया आणि अतिसार या आजारांचा समवेश आहे. WHOच्या मते 50पेक्षा जास्त प्रकारचे एडोनो विषाणू मानवी शरीरात आजार संक्रमणास कारणीभूत ठरतात.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


हेही वाचा :


Influenza : 'इन्फ्लुएंझा' श्वसनाचा संसर्गजन्य आजार; ही आहेत लक्षणं, असा टाळा प्रादुर्भाव 


Kids Immunity : कोरोनापासून मुलांचं संरक्षण कसं करावं ? 'या' विटामिनचा करा आहारात समावेश