Dussehra 2021 : 'सोनं घ्या सोन्यासारखं राहा!'; जाणून घ्या दसऱ्या दिवशी का वाटली जातात आपट्याची पानं
आज दसरा, रामाने अहंकारी रावणावर विजय मिळवला होता. दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतात.
![Dussehra 2021 : 'सोनं घ्या सोन्यासारखं राहा!'; जाणून घ्या दसऱ्या दिवशी का वाटली जातात आपट्याची पानं Dussehra 2021 Find out why Apta Leaves are distributed on the festival of Dussehra Dussehra 2021 : 'सोनं घ्या सोन्यासारखं राहा!'; जाणून घ्या दसऱ्या दिवशी का वाटली जातात आपट्याची पानं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/15/f32a02aa8b3f71fd67d979cdae62fa8f_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dussehra 2021 : आज दसरा, रामाने अहंकारी रावणावर विजय मिळवला होता. दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतात. या दिवशी भगवान रामाने अहंकारी रावणाचा वध केला. पंचांगानुसार, आज काय आहे खास, जाणून घेऊयात. पंचांगानुसार, विजयादशमीची पूजा 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:16 ते दुपारी 03:33 या वेळेत करावी. या दिवशी ‘अस्त्र’ ची पूजा केली जाते. तसेच भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची प्रार्थना देखील करावी.
पूजेचे साहित्य
दोन वाट्या घ्या, एकामध्ये नाणी आणि रोली ठेवा. दुसऱ्यामध्ये तांदूळ, फुले आणि सुक्या खजूर (चुरा) ठेवा. हे सर्व तसेच केळी, मुळा, गवारफल्ली, गूळ हे देवाला अर्पण करा.
आपट्याच्या पानाचं महत्व
दसऱ्या दिवशी सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्यांच्या पानांची एक काथा आहे. वरतंतू गुरू आपल्या आश्रमात शिष्यंना ज्ञान दान करत होते. बरेच विद्यार्थी त्यांच्याकडे वेदाभ्यास आणि शास्त्रअभ्यासाचे शिक्षण घेण्यासाठी येत असत. एकेदिवशी, वरतंतू यांच्या कौत्स या शिष्याने त्यांना प्रश्न विचारला की, 'गुरूजी तुम्ही मला एवढे ज्ञान दिले. त्याबदल्यात मी तुम्हाला गुरूदक्षिणा काय देऊ शकतो?' त्यावर वरतंतू गुरू यांनी त्यांना सांगितले,'कौत्स, ज्ञान हे दान करावे. त्याचा बाजार करू नये. तुला ज्ञान मिळाले हिच माझी गुरूदक्षिणा आहे.' मात्र कौत्स वरतंतू . वरतंतू गुरू यांना सारखे गुरूदक्षिणाबाबत विचारत होता. त्यावेळी वरतंतू गुरू म्हणाले, 'मी तुला चौदा विद्या शिकवल्या तर तु मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे'. कौत्सला वाटले की एवढे धन तो सहज कमवेल पण त्याला ते जमत नव्हते. कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्या राजाला त्याने चौदा कोटी सुवर्ण मोहरा मागितल्या. राजाने त्याची सर्व संपत्ती दान केली होती. फण कौत्साला तो म्हणाला की, 'तू तीन दिवसानंतर ये' रघुराजाने कुबेराकडे निरोप पाठवला. धन येईल मग तो युद्धाची तयारी करेल असे राजाला वाटले. ही बातमी इंद्राला कळाली. इंद्राने रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या अपट्यांच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. दुसऱ्या दिवशी राजाने तो सुवर्ण मुद्रांचा ढिग पाहिला. राजाने कौत्साला हवं तेवढं धन घे असे म्हटले. पण त्याने मात्र गुरूदक्षिणा देता येईल तेवढंच धन घेतले. बाकी मुद्रा राजाने प्रजेला दिल्या. ते धन राजाने आपट्याच्या झाडाखाली वाटले आणि तो दिवस दसऱ्याचा होता. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात.
Dussehra 2021 Live :आज दसरा, दसऱ्याचा उत्साह, राजकीय मेळावे, वाचा प्रत्येक अपडेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)