Drinking A Cup Of Tea After Meals Harms Your Health : चहा अनेकांना जीव की प्राण असतो. चहा प्रेमी चहाची तलफ भागवण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते. जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. चहा पावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायलं जड जातं. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं, असं तज्ञ सांगतात.  


याशिवाय चहामध्ये कॅफिनही असतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचं अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल म्हणजे स्‍टेरॉईड हार्मोन्स वाढवतं. यामुळे शरीरला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यात हृदयासंबंधित आजार, मधुमेह आणि वजन वाढणं इत्यादींचा समावेश आहे.  


चहामध्ये 'पॉलिफेनोल्स' आणि 'टेनिन' इत्यादी घटक असतात, जे जेवणातील लोह शोषत नाहीत, परिणामी शरीरालाही त्याचा फायदा होत नाही. विशेषत: महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरतात. जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय राहू शकत नाही तर जेवणानंतर किमान एक तासाने घ्यावा, असं तज्ञ सांगतात.


चहा पित असताना पाणी पिऊ नका
अनेकांना चहा पिल्यानंतर किंवा आधी पाणी प्यायची सवय असते. पण चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्यानं तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. चहा प्यायल्यानंतर पणी प्यायल्यानं पचन क्रिया खराब होईल. तसेच अॅसिडीटीची समस्या तुम्हाला जाणवेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर संबंधित बातम्या