Gold History : सोन्याला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते, कारण अगदी अनादी काळापासून सोने संपत्तीचे प्रतीक मानले जात होते. याबरोबरच हौस म्हणून ही सोने वापरली जाण्याची पद्धत होती. काही दशकांपूर्वी पैशाचे पत त्याच्या मागे ठेवलेल्या सोन्यावर ठरत असे. त्याला गोल्ड स्टॅंडर्ड म्हणतात. गोल्ड स्टॅंडर्ड ही एक अशी प्रणाली होती, ज्यामध्ये जवळजवळ सर्वच देशांच्या चलनाचे मूल्य काही प्रमाणात त्या देशांकडे किती सोनं आहे, यावरून निश्चित केले जात होतं. तसेच एका देशाचे चलन दुसऱ्या देशात चालत नसल्याने बऱ्याच वेळा व्यवहारासाठी देखील सोन्याच्या नाण्यांचा किंवा विटांचा उपयोग केला जात होता. त्यावेळी सोन्याच्या आयात किंवा निर्यातीवर कोणतेही बंधन नव्हते. आज सोन्याने एक नवीनच उंची गाठली आहे. आज सोन्याच्या एका तोळ्याची किंमत 51,730 रुपये इतकी आहे. मात्र पहिल्यांदा ज्या माणसाला सोने सापडले होते, तेव्हा त्याला याची किंमत आणि महत्व कळलं असेल का? नेमका काय आहे सोन्याचा इतिहास, हेच आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.          

  


सोन्याचा इतिहास 


एपिक चॅनलच्या डॉक्युमेंटरीनुसार, 5500 वर्षांपूर्वी पहिल्यांदा सोने सापडले होते. हे सोने इजिप्तमध्ये सापडले होते. जगात पहिल्यांदा मानवाने जर कोणते धातू शोधले असले, तर ते सोने होते आणि त्यानंतर मानवाने तांब्याचा शोध लावला. पहिल्यांदा जेव्हा मानवाला सोने सापडले, तेव्हा त्यांना याचे महत्व माहित नव्हते. मात्र वेळेनुसार लोकांना सोन्याचे महत्व कळत गेले. जेव्हा पहिल्यांदा सोने सापडले, तेव्हा लोकांना ते एक सामान्य दगड वाटायचे. मात्र नंतर त्यांना हळूहळू कळले की हा एक मौल्यवान दगड आहे. त्यांना कळले की याला गंज लागत नाही. तसेच याला कोणताही आकार दिला जाऊ शकतो. हे खुपच चमकदार असून याची चमक नेहमी अबाधित राहते.


भारतात कधी आले सोने


भारतात सोन्याचा शोध कधी व कुठे लागला असा प्रश्न तुम्हाला पडला असले. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 1800 वर्षांपूर्वीपासूनच सोन्याचा खाणी होत्या. कर्नाटकातील रायचूर खाणीतील सोन्याचे कार्बन रेटिंग 200 इसवी सनापेक्षा जुने असल्याचे दिसून आले आहे. देशात सध्या कर्नाटकात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन केले जाते.


संबंधित बातम्या


Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?


Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!


Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे