Aruna Irani : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी (Aruna Irani) यांनी चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांमुळे खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम केले आणि त्यांच्या प्रत्येक पात्रामुळे त्यांनी खूप नाव कमावले. सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी यांचे व्यावसायिक आयुष्य पुस्तकासारखे सर्वांसमोर खुले आहे. पण, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींची अनेकांना कल्पना नसते.


अलिकडेच अरुणा ईराणी यांनी एक वेब साईटला मुलाखत दिली. यात त्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्री अरुणा ईराणी यांनी वयाच्या 44व्या वर्षी दिग्दर्शक कुक्कू लग्नगाठ बांधली होती. वयाच्या चाळीशीपर्यंत त्यांनी लग्नाचा विचार देखील केला नव्हता. अरुणा ईराणी यांची भेट कुक्कू यांच्याशी झाली, तेव्हा त्यांनी चाळीशी पार केली होती. आता लग्नाच्या तब्बल 32 वर्षांनंतर त्यांनी पतीबद्दल मोठा खुलासा केला आहे.


पतीबद्दलची ‘ही’ गोष्ट माहीतच नव्हती!


अरुणा म्हणाल्या की, जेव्हा त्यांची कुक्कू यांच्याशी पहिली भेट झाली, तेव्हा त्यांचे पहिले लग्न झाले होते आणि त्यांना मुलंदेखील होती ही गोष्ट मला माहीतच नव्हती. ही गोष्ट माहिती नसल्यामुळे आम्ही आमचे नाते पुढे नेले. त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहितीच नव्हती, त्यामुळे मी प्रेमात पडले. मी आता इतक्या वर्षानंतर ही गोष्ट बोलू शकते. कारण, आता त्यांची पहिली पत्नी या जगत नाही. आम्ही कधीच या नात्याबद्दल बोललो नाही.


थोडा रुसवा अन् थोडं प्रेम!


या प्रेमकहाणीची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, चित्रपटाच्या सेटवर मी नेहमी वेळेत यायचे. मात्र, कुक्कू कलाकारांना नेहमीच थांबवून ठेवायचे. यामुळे माझे आणि त्यांचे वाद व्हायचे. यानंतर मी रागावले की, ते माझी समजूत काढायचे. या दरम्यान आम्ही प्रेमात कधी पडलो, ते कळलंच नाही.


हेही वाचा :