मुंबई : अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते. जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यसाठी अजिबात चांगलं नाही. चहा पावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायलं जड जातं. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं.
याशिवाय चहामध्ये कॅफिनही असतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचं अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल म्हणजे स्टेरॉईड हार्मोन्स वाढवतं. यामुळे शरीरला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यात हृदयासंबंधित आजार, मधुमेह आणि वजन वाढणं इत्यादींचा समावेश आहे.
चहामध्ये 'पॉलिफेनोल्स' आणि 'टेनिन' इत्यादी घटक असतात, जे जेवणातील लोह शोषत नाहीत, परिणामी शरीरालाही त्याचा फायदा होत नाही. विशेषत: महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरतात. जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय राहू शकत नाही तर जेवणानंतर किमान एक तासाने प्यावी.
जास्त गरम कॉफी कॅन्सरचं कारण
गरम कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉफी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं आहे. कोणतंही पेय 65 डिग्री पेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलं. आहे. कॉफी ही आरोग्यास हानिकारक नाही, मात्र अधिक गरम असल्यास कॅन्सरची शक्यता असल्याचं समोर आलं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Health Tips : हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
- Winter Skin Care : हिवाळ्यात तजेलदार त्वचा हवीय? करा 'या' नैसर्गिक तेलांचा वापर
- Kim Jong Un : किंम जोंग उनने गाठला निर्घृणतेचा कळस; दक्षिण कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे सात जणांना मृत्यूदंड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha