Weight Gain : वजन कमी असेल तर शरीरामधील इम्यूनिटी पॉवर कमी होते. त्यामुळे वजन योग्यप्रमाणात असावे. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही या 10 गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. 


1. केळी  (Banana)- वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये केळीचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला 3-4 केळी रोज खाव्या लागतील. केळीमध्ये पोषक तत्त्वे असतात.  1 वाटी दही किंवा दूधासोबत  केळी खा. यामुळे तुमचे वजन झटपट वाढेल. 


2. दूध आणि मध (Milk and Honey)- रोज मध खाल्याने वजन वाढते. दूधामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे. सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मध टाकलेले दूध प्यावे. यामुळे तुमची पचन शक्ती वाढेल आणि वजन देखील वाढण्यास मदत होईल. 


4- दूध आणि ओट्स (Milk and Oats)- फूल फॅट मिल्क आणि ओट्स वजन वाढवण्यासाठी खावे. सकाळी दूध आणि ओट्स खाल्याने दिवसभर भूक जास्त लागते. त्यामुळे वजन वाढते. 


3  बादाम, खजूर आणि अंजीर (Almond Dates and Figs)- वजन वाढवण्यासाठी 3-4 बदाम, खजूर आणि अंजीर हे सर्व दूधामध्ये टाकून ते दूध उकळवून घ्या. हे दूध रोज प्यावे. त्यामुळे देखील वजन वाढते. रात्री झोपण्याआधी हे दूध प्यावे. 


7- पीनट बटर (Peanut Butter)- ब्रेड किंवा टोस्टसोबत पीनट बटर खावे. जीममधील ट्रेनर वेट गेनसाठी पीनट बटर खाण्याचा सल्ला नेहमी देत असतात. 


8- सोयाबीन (Soybean)- सोयाबीनची भाजी, उकडलेले सोयाबीन किंवा सोयाबीनचा भात हे पदार्थ खाल्याने वजन वाढते. सोयाबीन शरीराला मजबूत करते. 


9. तूप (Ghee) - तूपामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच तूपामध्ये कॅलरीज देखील मोठ्या प्रमाणात असतात. 


10. सफरचंद आणि गाजर (Apple and Carrot)- सफरचंद आणि गाजरचा ज्यूस दररोज प्यायल्याने तुमचे वजन वाढेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Health Tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा हा 'होम मेड पॅक' पायाचे तळवे होतील मुलायम


Weight Loss : पोटाची चरबी वाढलीये? भोपळ्याचा ज्यूस ठरतो फायदेशीर, असा करा झटपट तयार