Swiggy Report : सध्या ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या डिश लोक ऑर्डर करत असतात. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये ऑनलाइनपद्धतीने जेवण ऑर्डर केले जाते. नुकताच फूड डिलेव्हरी कंपनी स्विगीने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये या कंपनीने 2021 मध्ये देशातील शहरांनी कोणत्या डिशेस सर्वाधिक ऑर्डर केल्या त्यांची यादी आहे. जाणून घेऊयात कोणत्या डिशेस वर्षभरात लोकांनी सर्वाधिक ऑर्डर केल्या-
फूड डिलेव्हरी कंपनी स्विगीने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, भारतीयांनी यावर्षी दर मिनिटाला 115 चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. 2021 मध्ये 5.5 कोटींहून अधिक लोकांनी चिकन बिर्याणी ऑर्डर केली. तर 2021 मध्ये सर्वाधिक ऑर्डर केलेले स्नॅक हे समोसा आहे. वर्षभरात एकूण 5 मिलीयन म्हणजेच 50 लाख लोकांनी समोसा ऑर्डर केला.
मुंबईकरांनी ऑर्डर केली दाल खिचडी तर पुणेकरांनी दिली पनीर टिक्का मसाल्याला पसंती
2021 मध्ये मुंबईकरांनी स्विगीवरून सर्वाधिक वेळा दाल खिचडी ऑर्डर केली. पुणेकरांनी पनीर टिक्का मसाला सर्वाधिक वेळा ऑर्डर केला.
मुंबईकरांनी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिश या पुढील प्रमाणे आहेत-
दाल खिचडी,चिकन फ्राइड राइस, पाव भाजी, मसाला डोसा आणि गार्लिक ब्रेड स्टिक
पुणेकरांनी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिश-
पनिर टिक्का मसाला, चिकन दम बिर्यानी, दाल खिचडी, जिरा राइस आणि दाल तडका
बंगळूरू ठरले आरोग्याबाबत सर्वाधिक जागरूक शहर
स्विगीने जाहिर केलेल्या रिपोर्टनुसार, बेंगळुरू हे शहर आरोग्याबाबत सर्वाधिक जागरूक शहर आहे. कारण बेंगळुरूमधील बहुतेक लोकांनी सोमवार आणि गुरुवारी हेल्दी फूड ऑर्डर केले, तर किटो डाएट फूड ऑर्डर्स या 23 टक्के वाढल्या आणि शाकाहारी आणि वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या डिशच्या ऑर्डर्समध्ये 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या
Health Tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा हा 'होम मेड पॅक' पायाचे तळवे होतील मुलायम
Weight Gain Food : दूध, केळी अन् तूप; वजन वाढवण्यासाठी आहारात करा 'या' 10 गोष्टींचा समावेश