Cold Water Side Effects : उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याची क्रेझ वाढत असते. वाढत्या तापमानामुळे लोक तहान भागवण्यासाठी थंड पाणी पितात. थंड पाणी पिल्याने तहान भागते. परंतु, जास्त थंड पाणी तुमचे नुकसानही करू शकते. जास्त थंड पाणी तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते. उन्हाळ्यात लोकांनी जास्त पाणी प्यावे. परंतु, जास्त थंड पाण्याने शरीराचे नुकसान होते.  


मौलाना आझाद रुग्णालयाचे डॉक्टर गिरीश त्यागी याबाबत माहिती दिली आहे.  जास्त पाणी पिल्याने शरीराचे तापमान योग्य राहते. शरीरातून घातक विषारी पदार्थ बाहेर पडतात. उन्हाळ्यात पाण्यामुळे लोकांना हायड्रेटेड राहते. उन्हात बाहेर गेल्यास डिहायड्रेशनही टाळले जाते. परंतु, उन्हाळ्यात जास्त थंड पाणी शरीराला हानी पोहोचवू शकते. आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस राहते. अशा परिस्थितीत जर आपण खूप थंड पाणी प्यायलो तर आपल्या शरीराला पाणी सामान्य तापमानात आणण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते आणि शरीरात असंतुलन निर्माण होते, अशी माहिती डॉय गिरीश त्यागी यांनी दिली आहे. 


जास्त थंड पाणी पिळ्यामुळे पचनक्रियेमध्ये समस्या निर्माण होतात. कारण अन्न खाताना जर खूप थंड पाणी प्यायले तर अन्न पचण्याऐवजी आपले शरीर त्या उर्जेचा वापर पाण्याचे तापमान सामान्य करण्यासाठी करते. त्यामुळे जेवताना जास्त थंड पाणी पिऊ नये, असे डॉ गिरीश त्यागी यांनी सांगितले आहे. 


 जास्त थंड पाणी शरीराला हानी पोहोचवत असेत. तसेच  खूप गरम पाणी पिणे देखील टाळले पाहिजे. कारण जास्त गरम पाणी पिल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढते. अशा स्थितीत शरीर अधिक तापू लागते. त्यामुळे गरम पाणी प्यायचे असले तरी खोलीच्या तापमानानुसार किंवा कोमट पाणीच प्यावे.


महत्वाच्या बातम्या