Maharashtra Flood :  राज्यातील पुरग्रस्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.  यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली होती आणि पूरही आला होता. यात अनेकांची घर, दुकानं यांचं मोठं नुकसान झालं होतं. पण मदतीची घोषणा होऊनही त्यांना अजूनही मदत मिळालेली नव्हती. आता सहा महिन्यांनी मदत वितरित करण्याचा आदेश शासनानं काढला आहे. 85 कोटी 77 लाख इतका हा निधी विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहे.


मृत जनावर, तुटलेली वाहून गेलेली घर, दुकानदार टपरी चालक, कुकुट पालन असे नुकसान झालेल्या सगळ्यांसाठी हा मदतनिधी आहे. निधी आला ही आनंदाची बाब मात्र याला शासनाच्या नियोजन शून्यतेचा फटका सुद्धा बसला आहे.
शासनाने 31 तारखेला हा निधी विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला मात्र त्याच दिवशी निधी वितरित करणारी Beams ( बिम्स ) प्रणाली बंद झाली आता हा निधी येऊन पडला आहे मात्र वितरण बंद आहे. त्यामुळं गेल्या वर्षीचा निधी या वर्षी घेणं कंठीण आहे यात हस्तक्षेप करून शासन निधी वितरित करेलही मात्र आधीच उशीर झालेला असताना आणखी उशीर होणार हे ही स्पष्ट आहे.


पूरग्रस्तांना कशी मिळणार मदत?



  • कपड्यांच्या नुकसानाकरता  प्रति कुटुंब 5 हजार रुपये 

  • घरगुती भांडी वस्तू नुकसानाकरता प्रति कुटुंब 5 हजार रुपये 

  • 48 तासांपेक्षा अधिक कालावधीत क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल


पूर्ण  नष्ट झालेल्या  कच्च्या-पक्क्या घरासाठी दीड लाख रुपये प्रति घर मदत खालील प्रमाणे : 



  • कपड्यांच्या नुकसानाकरता  प्रति कुटुंब 5 हजार रुपये 

  • घरगुती भांडी वस्तू नुकसानाकरता प्रति कुटुंब 5 हजार रुपये 

  •  48 तासांपेक्षा अधिक कालावधीत क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल

  • पूर्ण  नष्ट झालेल्या  कच्च्या-पक्क्या घरासाठी दीड लाख रुपये प्रति घर मदत खालील प्रमाणे



  1. अंशतः पडझड (50टक्के) 50 हजार रुपये प्रति घर

  2. अंशतः पडझड (25टक्के) 25 हजार रुपये प्रति घर

  3. अंशतः पडझड (15टक्के) 15 हजार रुपये प्रति घर

  4. नष्ट झालेल्या झोपडीसाठी प्रति झोपडी 15 हजार रुपये



  • दुधाळ जनावरे 40 हजार

  • ओढकाम करणारी जनावरे 30 हजार रुपये

  • मेंढी, बकरी 4 हजार रुपये

  • दुकानदार, बारा बलुतेदारांना 50 हजार रुपयांची मदत

  • टपरीधारक 10 हजार रुपये

  • कुक्कुटपालन 5 हजार रुपये


संबंधित बातम्या :


पुरग्रस्ताच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला! उस्मानाबादमधील गंभीर प्रकार समोर