Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.






यामी शनिवारपासून इंस्टाग्राम अॅक्सेस करू शकलेली नाही. त्यामुळे तिने ट्वीट करत चाहत्यांना सावध केले आहे. यामीने ट्वीट करत लिहिले आहे, मी शनिवारपासून माझं इंस्टाग्राम अकाऊंट अॅक्सेस करू शकलेली नाही. आता ते रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.





यामी आधी अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. यामीचा 'दसवीं' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नोरा अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक


Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार


Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha