World Autism Awareness Day 2022 : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनंतर दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन (World Autism Awareness Day) साजरा केला जातो. हा एक मानसिक आजार आहे जो पहिल्यांदा मुलांमध्ये दिसून आला होता. जगभरात या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझमची लक्षणं नेमकी कोणती? आणि यावर उपाय काय? या संदर्भात सगळी माहिती येथे जाणून घ्या. 


 ऑटिझम म्हणजे काय ?


तज्ज्ञांच्या मते, ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार 1-3 वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही. यामुळे मुलांचा मेंदू संकुचित होतो. त्यामुळे मुलं कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहू लागतात.


ऑटिझमची लक्षणे (Autism Symptoms) : 


1. मुले इतरांशी पटकन नजर मिळवत नाहीत.  


2. ते त्यांच्याच विश्वात हरवलेले असतात.


3. भाषा शिकण्यात अडथळे निर्माण होतात. 


4. कोणाचा आवाज ऐकून प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. 


5. सामान्य मुलांपेक्षा ही मुलं वेगळी दिसू लागतात.     


6. जर तुमचे मूल नऊ महिन्यांचे असेल. आणि हसत नसेल किंवा नीट लक्ष देत नसेल तर ही ऑटिझमची लक्षणं असू शकतात. 


7. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.


'ही' काळजी घेणे आवश्यक आहे


1. लक्षणे दिसू लागल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.


2. मुलाशी चांगले वागा.


3. मुलाला खेळण्यासाठी साधी खेळणी द्या.


4. मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका.


5. मुलाची नेहमी नवीन लोकांशी ओळख करून द्या.


6. मुलाला मैदानी खेळ खेळायला लावा आणि मुलाचा आत्मविश्वास थोडा be{be.


7. फोटोंद्वारे मुलाला गोष्टी समजावून सांगा.


8. मुलाच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्या.


ऑटिझमचा उपचार : 


ऑटिझमवर अजून कोणताही अचूक उपचार उपलब्ध नाही. मुलाची स्थिती पाहून काय उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात. थेरपी, बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, फोटो थेरपी इत्यादी थेरपी त्याच्या उपचारात केली जाते. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha