Onion Peel Benefits : कांद्याची सालं कचरा म्हणून फेकून देताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे फायदे..
Onion Peel : कांद्याप्रमाणेच त्याची साल देखील खूप उपयुक्त आहे. कांद्याची साले कशासाठी वापरली जाऊ शकतात, ते जाणून घेऊया..
Onion Peel : भारतात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ अतिशय चवीने खाल्ले आणि खायला दिले जातात. या पदार्थांसोबत कांद्याचे तुकडे देखील हमखास असतात. कांदा जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जातो. लोक कांदा वापरतात, पण त्याची साल काढून फेकून देतात. तुम्ही देखील असंच करत असाल, तर थांबा! कांद्याप्रमाणेच त्याची साल देखील खूप उपयुक्त आहे. कांद्याची साले कशासाठी वापरली जाऊ शकतात, ते जाणून घेऊया..
कंपोस्ट खत तयार करा : कांद्याची साल वापरून घरी पोटॅशियमयुक्त कंपोस्ट तयार करू शकता, ज्याच्या मदतीने झाडे जलद वाढतील. यासाठी कांद्याची साले कचऱ्यात टाकण्याऐवजी अर्ध्या मातीने भरलेल्या भांड्यात गोळा करायला सुरुवात करा आणि त्यात वेळोवेळी पाणी टाकत राहा. असे केल्याने, काही दिवसांत, कांद्याच्या सालीपासून कंपोस्ट खत तयार होईल.
झोपेची समस्या दूर पळवा : अनेक वेळा, दिवसभर काम करूनही, एखाद्या व्यक्तीला रात्री चांगली झोप न मिळण्याची समस्या येते, ज्यामुळे तणाव आणि थकवा येऊ लागतो. अशा परिस्थितीत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कांद्याच्या सालीपासून तयार केलेला चहा प्यावा. झोपण्यापूर्वी कांद्याच्या सालीपासून बनवलेला चहा प्यायल्याने चांगली झोप लागते, तर मेंदूच्या स्नायूंना आराम मिळतो. शरीर, मन आणि स्नायूंना विश्रांती मिळते आणि व्यक्ती चांगली आणि गाढ झोप घेऊ शकते.
खाजेच्या समस्येवर गुणकारी : कांद्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने खाज येण्यापासून आराम मिळतो. कांद्याच्या सालीमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे ऍथलीट फूट नावाच्या त्वचेच्या खाज सुटण्यासारख्या आजारांपासून मुक्त होण्यास फायदेशीर ठरतात. यासाठी कांद्याची साले पाण्यात टाकून चांगले उकळा आणि पाणी अर्धे राहिल्यावर थंड करून बाटलीत भरा. आता हे पाणी रोज त्वचेवर लावा, ज्यामुळे संक्रमित भागावर खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
पाय आणि स्नायू दुखीवर लाभदायी : पाय दुखणे आणि स्नायूंच्या क्रॅम्पने त्रास होत असेल, तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीपासून तयार केलेला चहा घेऊ शकता. यासाठी 1 ग्लास पाण्यात कांद्याची साल टाका आणि 15 मिनिटे उकळा, त्यानंतर पाणी गाळून घ्या. कांद्याच्या सालीपासून बनवलेल्या चहाची चव वाढवण्यासाठी त्यात थोडा मधही घालू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी कांद्याच्या सालीपासून बनवलेला चहा घेतल्याने पाय दुखणे आणि पेटके येणे यापासून आराम मिळतो.
नैसर्गिक हेअर कलर : केसांना सुंदर आणि आकर्षक बनवायचे असेल, तर कांद्याच्या साली वापरून केसांचा नैसर्गिक रंग तयार करता येतो. यासाठी कांद्याची साले पाण्यात टाकून किमान 1 तास उकळा, त्यानंतर रात्रभर थंड होण्यासाठी सोडा. दुसर्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि केसांवर हेअर डायप्रमाणे लावा आणि 30 मिनिटे केसांना कोरडे होऊ द्या. यानंतर केस थंड पाण्याने धुवा, तुमचे केस नैसर्गिकरित्या चेरी लाल रंगाचे होतील. याशिवाय जर तुम्हाला गडद रंग हवा असेल, तर दर आठवड्याला ही प्रक्रिया करत राहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
- Weight Loss : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha