Jaggery Benefits In Summer : गूळ (jaggery) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गूळामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचे सेवन हिवाळ्यात जास्त केले जाते. पण उन्हाळ्यामध्ये ताकासोबत गूळाचे सेवन करावे. ताकासोबत गूळाचे सेवन केल्यानं उष्माघात होण्याचे प्रमाण कमी होते. अनेक लोक उन्हाळ्यामध्ये मसाला ताक पितात. पण ताकासोबत गूळाचे सेवन करणं फायदेशीर ठरते. गूळ आणि ताकाचे सेवन कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात करावे? त्याचे फायदे काय आहेत? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. जाणून घेऊयात याबाबत माहिती...


ताकासोबत गूळाचे सेवन करण्याचे फायदे


अनेक लोक गूळ आणि ताकाचे सेवन दुपारी करतात. शरीरामध्ये जर अशक्तपणा जाणवत असेल तर गूळ आणि ताकाचे सेवन करावे. गूळ आणि ताकाचे सेवन केल्यानं अॅनिमियाची समस्या दूर होते. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीर हायड्रेट ठेवायचं असेल तर तुम्ही गूळ आणि ताकाचे सेवन करु शकता. शरीरामधील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर चक्कर येणे मळमळ होणे इत्यादी समस्या तुम्हाला जाणवू शकतात. त्यामुळे गूळ आणि ताकाचे सेवन करावे. ताकासोबत गूळाचे सेवन केल्यानं पोट साफ होते. तसेच बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी समस्याही तुम्हाला जाणवणार नाहीत. 


दिवसातून दोन वेळा ताकासोबत करा गूळाचे सेवन
दिवसातून दोन वेळा ताकासोबत गूळाचे सेवन करावे. सकाळी नाश्ता करताना किंवा दुपारी जेवण करताना तुम्ही ताकासोबत गूळाचे सेवन करु शकता. जर तुम्हाला उन्हामध्ये जायचं असेल तर बाहेर जाण्याआधी देखील तुम्ही ताकासोबत गूळाचे सेवन करु शकता. 


प्रमाण 
दररोज एक ग्लास ताकासोबत गूळाचे सेवन करावे. ताकामध्ये हिंग आणि जीराऱ्याची पावडर तुम्ही मिक्स करु शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :