Health Tips : अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या, आठवडाभरात 'या' आजारांपासून मुक्ती मिळेल
Health Tips : अंजीर हे आरोग्यासाठी सुपरफूड आहे. बहुतेक लोक त्यांचा आहारात नक्कीच समावेश करतात.
Health Tips : अंजीर (Anjeer) हे आरोग्यासाठी सुपरफूड आहे. अंजीराचे बदाम आणि मनुकाप्रमाणे लोक सेवन करत नसले तरी बहुतेक लोक त्यांचा आहारात नक्कीच समावेश करतात. पण रोज किमान 1-2 अंजीर रात्रभर भिजवून फुगल्यानंतर नक्की खावेत. जर तुम्हालाही अशक्तपणाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही भिजवलेले अंजीर तुमच्या आहाराचा एक भाग बनवा. 2 बदाम, अक्रोड आणि भिजवलेले काजू बरोबर अंजीर खायला विसरू नका. एक ग्लास पाण्यात भिजवलेले दोन अंजीर खाऊन दिवसाची सुरुवात करा. तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.
अंजीर पाणी पिणे महत्वाचे का आहे?
प्रजनन अवयव निरोगी राहण्यासाठी उपयुक्त :
अंजीर पाणी आणि अंजीर खाल्ल्याने प्रजनन अवयव निरोगी राहते. अंजीरमध्ये अनेक आवश्यक खनिजे असतात. जसे जस्त, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि लोह इ. यामुळे तुमचे प्रजनन आरोग्य सुधारते. याशिवाय त्यात उच्च अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. कोणते ड्राय फ्रूट रजोनिवृत्तीनंतरच्या समस्यांपासूनही बचाव करते.
रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवते
अंजीरमध्ये पोटॅशियम जास्त असते. तसेच, अंजीरमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. टाईप-2 डायबिटीज असलेले लोक भिजवलेले अंजीर खाऊन रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात.
बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त आहे
अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अंजीर जरूर खावे. हे आहारासाठी चांगले आहे.
त्वचेच्या आरोग्यासाठी अंजीर चांगले
तुम्ही जर त्वचेच्या समस्येने त्रस्त आहात तर अंजीरचा आहारात नक्की समावेश करा. ते पोट आणि त्वचेसाठी खूप चांगले आहे. निरोगी त्वचेसाठी चांगले.
वजन कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करावा. यामध्ये भरपूर फायबर असते जे त्वचा आणि शरीरासाठी चांगले असते.
तुम्ही रोज अंजीर खाण्याची सवय लावली तर तुम्हाला नक्कीच वरील सांगितलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. आणि तुम्ही तणावमुक्त आयुष्य जगू शकता. यासाठी अंजीराचा समावेश तुमच्या आहारात तसेच जीलनशैलीचा एक भाग बनवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :