3th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 3 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील मंगळागौरीपूजनाचा दिवस. श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 3 ऑगस्ट दिनविशेष.
1984: भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री याचा जन्म
सुनील छेत्री याचा जन्म 3 ऑगस्ट 1984 रोजी झाला. तो फुटबॉलपटू आहे. सुनील स्ट्रायकर किंवा विंगर म्हणून खेळतो. तो इंडियन सुपर लीग क्लब बेंगळुरू एफसी आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन फॅन्टास्टिक म्हणून प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये तो क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 112 सामन्यांमध्ये 72 राष्ट्रीय गोल सुनील याने केले आहेत. त्याला पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्नसारख्या पुरस्कारांनी गौरविले आहे.
1960 : भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म
गोपाल शर्मा यांना स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेशकडून टीम इंडियामध्ये खेळणाऱ्या पहिला खेळाडू म्हणून ओळखले जाते. गोपाल शर्मा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1960 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात झाला. ऑफस्पिनर गोपालने टीम इंडियासाठी पाच कसोटी आणि 11 एकदिवसीय सामने खेळले. तो भारतासाठी आणखी सामने खेळू शकला असता, पण टीम इंडियाचे आणखी सहा खेळाडू त्याच्या मार्गात उभे राहिले. यामध्ये लक्ष्मण शिवरामकृष्णन, मनिंदर सिंग, अर्शद अयुब, शिवलाल यादव, रवी शास्त्री आणि नरेंद्र हिरवाणी यांचा समावेश होता. या दिग्गजांसह टीम इंडियात आपले स्थान पक्के करणे गोपाल शर्मासाठी सोपे नव्हते.
1956 : भारतीय क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म
मध्यमगती गोलंदाज बलविंदर सिंग संधूची क्रिकेट कारकीर्द खूपच कमी होती. पण 36 वर्षांपूर्वी भारताच्या विश्वचषक विजयात त्यांचे योगदान आजही थक्क करणारे आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात समाविष्ट झालेल्या संधूने आपल्या गोलंदाजीने भारताचा विजय सोपा केला होता. अंतिम सामन्यात संधूने 184 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडीज संघाचा सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज (1 धाव) याला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. खरं तर, त्या सामन्यात भारताला लवकर यश मिळवण्याची गरज होती, जी संधूने पूर्ण केली.
1900 : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारताचे स्वातंत्र्यसैनिक आणि संसदपटू होते. त्यांना 'क्रांती सिंह' म्हणून ओळखले जात असे. ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत त्यांनी 1940 मध्ये सातारा जिल्ह्यात ‘प्रति सरकार’ नावाचे स्वतंत्र सरकार स्थापन केले होते.
1898 : आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म
1939 : भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म
1924 : अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म
1916 : शकील बदायूँनी - गीतकार आणि शायर यांचा जन्म
1886 : हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म
2007 : लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन
1993 : अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन
1930 : आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन
1929 : ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन
1881 : अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचे निधन
महत्वाच्या घटना
2004 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.
2000: शाजी एन. करुण - मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
1997 : स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड - या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.
1994 : संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
1977 : TRS-८० कॉम्पुटर - टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
1960 : नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
1949 : नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन - बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.
1948 : भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) - स्थापना झाली.
1940 : दुसरे महायुद्ध - इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.
1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
1914 : एडॉल्फ हिटलर याने बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
1914 : पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.
1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी स्थापन झाली.
1859 : अमेरिकन डेंटल असोसिएशनची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.
1811 : जंगफ्राऊ शिखर या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
1783 : माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे 35 हजार लोकांचे निधन
1046 : सांताक्लॉज लँड, थीम पार्क - जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले
महत्वाच्या बातम्या :