Timepass 3 : 'टाइमपास' आणि 'टाइमपास 2'च्या यशानंतर आता 'टाइमपास 3' (Timepass 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. नुकतेच या सिनेमाचे कलेक्शन समोर आले आहे. या सिनेमाने 4.36 कोटींची कमाई केली आहे. 


'टाइमपास 3'ने केली 4.36 कोटींची कमाई


'टाइमपास 3' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 4.36 कोटींची कमाई केली आहे. प्रथमेश परबने कमाईचं पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रथमेशने लिहिलं आहे, पब्लिकच्या प्रेमासह मराठी ब्लॉकबस्टर 'टाइमपास 3'ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एन्ट्री. 4 दिवसांत कमावले 4.36 कोटी. 2 नं. लवचा 1 नं. लोचा पाहण्यासाठी 'टाइमपास 3'चं तिकीट बुक करा". 






'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात


'टाइमपास 3' या सिनेमावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मराठी एकीकरण समितीने फेसबुक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"रवी जाधव... तुमच्या सिनेमात हिंदी राष्ट्रभाषा असल्याची खोटी माहिती दाखवण्यात आली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या. अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात. सिनेमातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा". 


'टाइमपास 3' कुमारवयातल्या दगडू अन् पालवीचा 


'टाइमपास 3' या सिनेमात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. 'टाइमपास 3' या सिनेमात कुमारवयातल्या दगडू आणि पालवीचा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना दगडूच्या आयुष्यात आलेली पालवी पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Timepass 3 : 'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात; हिंदी राष्ट्राभाषा असल्याची खोटी माहिती दाखवल्याचा आरोप


Movies : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ