1st August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 1 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील पहिला सोमवार. त्याचबरोबर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 1 ऑगस्ट दिनविशेष.
1 ऑगस्ट : नागचतुर्थीचा उपवास (भावाचा उपवास)
नागचतुर्थीच्या उपवासाला भावाचा उपवास सुद्धा म्हणतात. श्रावणात माहेरवाशी माहेरी येतात. बऱ्याच परंपरेत नाग माहेरवाशीनीचा भाऊ समजतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी माहेरवाशीनी भावाच्या नावाने उपवास करतात त्याला नागाचा उपवास म्हणतात.
1 ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार (शिवामूठ तांदूळ)
1920 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक,लेखक, शाहीर तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन.
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Shravan 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Shravan 2022 : कधीपासून सुरु होतोय श्रावण महिना? 'ही' आहे सणांची यादी