31st July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. याच दिवशी भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 31 जुलैचे दिनविशेष.


सन 1947 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्मदिन.


मुमताज ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. 1960 आणि 1970 च्या दशकांदरम्यान अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या मुमताजला 1970 सालच्या खिलौना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. राजेश खन्नाच्या नायिकेच्या भूमिकेत तिने 10 चित्रपटांमध्ये काम केले आहे.


1948 साली भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.


1956 साली कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व दहा गाडी बाद करण्याचा विक्रम करणारे जिम लिंकर (Jim Laker) हे पहिले इंग्लिश क्रिकेटपटू बनले.


2001 साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहूमहाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.


1872 साली महाराष्ट्रातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक, चरित्रकार आणि गाथा संपादक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्मदिन.


1880 साली प्रसिद्ध भारतीय आधुनिक साहित्यिक, लेखक आणि कादंबरीकार धनपत राय श्रीवास्तव उर्फ मुंशी प्रेमचंद यांचा जन्मदिन.


मुंशी प्रेमचंद हे हिंदी आणि उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते.


1902 साली भारतातील सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई यांचा जन्मदिन.


1907 साली भारतीय गणितज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, इतिहासकार आणि प्राच्यविद्या पंडित दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्मदिन.


1912 साली नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन (Milton Friedman) यांचा जन्मदिन.


1982 साली सोवियत संघाने आण्विक चाचणी केली.


1918 साली भारतीय संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर उर्फ दादासाहेब वर्णेकर यांचा जन्मदिन.


महत्वाच्या बातम्या :