24th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 24 जुलै आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस भगवान श्री विष्णू यांची आराधना आणि पूजेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 24 जुलैचे दिनविशेष.


24 जुलै : कामिका एकादशी 


आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस भगवान श्री विष्णू यांची आराधना आणि पूजेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळून इच्छित फलप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या वर्षी रविवार, 24 जुलै 2022 रोजी कामिका एकादशी आहे. प्राचीन ग्रंथांनुसार, कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवऋषी नारदांना सांगितले आहे.


2000 : साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू सुब्बरमन विजयलक्ष्मी या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आणि महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 


1998 : परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय.


1997 : माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्‍च नागरी सन्मान भारतरत्‍न प्रदान


1997 : साली प्रसिद्ध भारतीय बंगाली लेखिका महाश्र्वेता देवी यांना पत्रकारिता, साहित्य आणि कला या क्षेत्रांतील उत्कुष्ट कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला


1911 : साली भारतीय बासरीवादक आणि संगीतकार तसेच, “भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य बासरीचे जनक” आणि उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे शिष्य पन्नालाल घोष यांचा जन्मदिन.


महत्वाच्या बातम्या :