TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबईमधील अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट मैदानावर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला काल (29 जुलै) आग लागली. सेटवर लायटिंगचे काम सुरू असताना आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला.
'वाका वाका गर्ल' शकीराला होऊ शकते अटक
पॉप सिंगर शकीरानं तिच्या 'वाका वाका' गाण्यातून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. पण शकीरावर आता टॅक्स चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तिच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे तिला आठ वर्षाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते. शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलानं शकीराला आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. या सरकारी वकीलानं शकीरावर टॅक्स चोरीचा आरोप लावला आहे. शकीरानं टॅक्स चोरीची याचिका फेटाळून लावली होती. 24 मिनियन यूरो (2.4 कोटी) फाइन शकीरानं भरावा, अशी देखील मागणी या सरकारी वकीलानं केली आहे.
'राष्ट्र' चित्रपट 26 ऑगस्ट रोजी होणार रिलीज
प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत राहतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण काही चित्रपट मात्र एक ना अनेक कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. 'राष्ट्र - एक रणभूमी' हा असाच एक आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. महामारीमुळं लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारं टायटल असणारा 'राष्ट्र' हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी रसिक दरबारी सादर होणार आहे.
'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या 'जवान' या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'एक विलन रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमादरम्यान शाहरुखच्या 'जवान'चा टीझर दाखवण्यात आला. 'जवान' सिनेमाची शाहरुखच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या वाजवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी अक्षय कुमारवर साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'राम सेतु' या सिनेमामुळे चर्चेत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खिलाडी कुमार आणि राम सेतु सिनेमावर निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम स्वामी अक्की यांनी राम सेतू या सिनेमात चुकीचे तथ्य मांडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि राम सेतुच्या टीमवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर 'झलक दिखला जा'मध्ये होणार सहभागी
'झलक दिखला जा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील 'झलक दिखला जा 10' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
तेजस बर्वेची 'बॉस माझी लाडाची' मालिकेत एन्ट्री
'बॉस माझी लाडाची' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील पायलट म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेची एन्ट्री होणार आहे.
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत भक्ताला मिळणार जीवनदान!
'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आता या मालिकेत श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने भक्ताला जीवनदान मिळणार आहे. भक्ताने पूर्ण श्रद्धेने, निर्मळ मनाने स्वामीं पुढे केलेली प्रार्थना वा मागणी कधी पूर्ण झाली नाही असे होत नाही. प्रत्यके अडीअडचणीच्या काळात स्वामी भक्ताला योग्य तो मार्ग दाखवतात आणि सुखरूप संकटातून बाहेर काढतात.
सोनू सूदने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस; गरजूंना मदत करण्याचे दिले आश्वासन
अभिनेता सोनू सूदचा आज 49 वा वाढदिवस आहे. सोनूने त्याचा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला आहे. सोनू दुबईत एका सिनेमाचे शूटिंग करत होता. पण वाढदिवशी त्याने मुंबई गाठली. सोनू मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा भागात राहतो. सोनूच्या वाढदिवशी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.
परमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव यांची शौर्यगाथा उलगडणार रुपेरी पडद्यावर
अभिनेत्री चित्रांगदा सिंह ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रांगदा ही अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मिती देखील करते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुरमा या चित्रपटामधून तिनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचे कथानक हॉकी खेळाडू संदीप सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू आणि दिलजीत दोसांझ या कलकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता चित्रांगदा आणखी एका व्यक्तीची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.