28th June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 28 जूनचे दिनविशेष.


1921 : भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)


1998 : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्ष पूर्ण झाली.


1838 : साली इंग्लंड देशाच्या राणी व्हिक्टोरिया (Queen Victoria) यांचा राज्याभिषेक करण्यात आला.


व्हिक्टोरिया या युनायटेड किंग्डमच्या राज्यकर्ती आणि ब्रिटिश भारताच्या पहिल्या सम्राज्ञी होत्या. त्या इ.स. 1837 साली ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आल्या.


1972 : साली भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध समाप्तीनंतर सिमला परिषदेचा मसुदा तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला.


1995 : साली वाघांना शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी आणि त्यांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला ‘टायगर्स स्टेट’ म्हणून घोषित करण्यात आलं.


1998 : साली संयुक्त राष्ट्रांने सन 1948 साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्यास पन्नास वर्ष पूर्ण झाली.


1883 : साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसेच, हिंदी वृत्तपत्र “दैनिक आज” चे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचा जन्मदिन.


1995 : साली पद्मश्री पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालिम्पिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थान्गावेलु यांचा जन्मदिन.


मरियप्पन थांगावेलू हा एक भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपटू आहे. त्याने पुरुषांच्या उंच उडी T-42 प्रकारात रिओ दि जानेरो येथे झालेल्या 2016 उन्हाळी पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्णपदक जिंकले.


1987 : साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांतील गायक आणि व्हायोलिन वादक पंडित गजाननबुवा अनंत जोशी यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :