26th June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 जूनचे दिनविशेष.


26 जून : छत्रपती शाहू महाराज जयंती.


शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी 18 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.


1999 : पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले 2 रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.


1974 : साली नागपुर जवळील कोरडी येथील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती करण्यास प्रारंभ करण्यात आला.


1999 : साली नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका निर्माण करण्यात आला.


1874 : साली कोल्हापुर येथील मराठयांच्या भोसले घराण्यातील शासक तसचं, थोर समाजसुधारक आणि लोकशाहीवादी तसचं, संगीत, नाटक कलेचे प्रोत्साहक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन.


1943 : साली नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ञ तसचं, रक्त गटांचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करणारे महान संशोधक कार्ल लैंडस्टीनर (Karl Landsteiner) यांचे निधन.


2001 : साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व कथा- कथाकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व. पु. काळे यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :