23rd June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 23 जूनचे दिनविशेष.
1757 : प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या 3,000 सैन्याने सिराज उद्दौलाच्या 50,000 सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
1969 : आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी 1997 पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
1953 : भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन.
1982 : बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.
1942 : जब्बार पटेल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक
जब्बार रझाक पटेल हे मराठी चित्रपटसृष्टीतील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले.
1952 : राज बब्बर, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते
राज बब्बर (Raj Babbar) हे हिंदी भाषेमधील चित्रपटअभिनेते आणि भारतीय राजकारणी आहेत. सन 1980 च्या दशकात राज बब्बर बाॅलिवुडचे चमकते सितारे होते. एकूण 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले.
महत्वाच्या बातम्या :