25th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 25 मे चे दिनविशेष.


इ.स. 1666 साली शिवाजी महाराज आग्र्याला मुघल बादशाहा औरंगजेबला भेटण्यासाठी गेले असताना त्यांना नजरकैद करण्यात आले.


1895 : इतिहास संशोधक, लेखक आणि संपादक त्र्यंबक शेजवलकर यांचा जन्म. 


मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक आणि इतिहासकार होते. त्र्यंबक शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाळातील इतिहासाविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. निजाम आणि पेशवे संबंध, पानिपत (1761), श्रीशिवछत्रपती हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. श्री शिवछत्रपति : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा आणि साधने या ग्रंथासाठी शेजवलकरांना‘ साहित्य अकादमी पुरस्कारा’चा (मरणोत्तर) बहुमान मिळाला.


1972 : भारतीय चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यांचा जन्म.       


करण जोहर हा एक भारतीय चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता तसेच लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. करणने आदित्य चोप्राच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका साकारून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात केली. 1998 साली त्याने 'कुछ कुछ होता है' ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. 


2005 : पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांचे निधन.    


सुनील दत्त हे एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि राजकारणी होते. ते मनमोहन सिंग सरकारमध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते. ते अभिनेता संजय दत्त आणि राजकारणी प्रिया दत्त यांचे वडील आहेत. 1968 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 1984 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून पाच वेळा भारताच्या संसदेवर निवडून आले. 


1886 : भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस यांचा जन्म. 


रासबिहारी बोस हे भारतीय क्रांतिकारी नेते होते. ते गदर विद्रोह आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या मुख्य संयोजकांपैकी एक होते. 


सन 1992 साली प्रख्यात भारतीय बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना साहित्य क्षेत्रांतील सेर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला.


1831 साली प्रख्यात भारतीय उर्दू गझल कवी दाग देहलवी यांचा जन्मदिन.


1999 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायन अभियंता आणि माजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक बाळ दत्तात्रेय टिळक यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :