24th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 24 मे चे दिनविशेष.
जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन 2022
जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात. स्किझोफ्रेनिया हा त्याच आजारांपैकी एक आहे. हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. हा विकार मेंदूच्या कार्यावर परिणाम करतो. यााबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 24 मे रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिन साजरा केला जातो.
1819 : इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म.
व्हिक्टोरिया ही युनायटेड किंग्डमची राज्यकर्ती व ब्रिटिश भारताची पहिली सम्राज्ञी होती.त्या इ.स. 1837 साली ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली. 63 वर्षे सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वांत प्रदीर्घ काळ राज्य करणारी राज्यकर्ती आहे.तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्व ह्या नावाने ओळखला जातो जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय,औद्योगिक,सांस्कृतिक आणि लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो. इ.स. 1857 च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला.त्यावेळी तिने काढलेला जाहिरनामा राणीचा जाहिरनामा म्हणून प्रसिद्ध आहे.हिंदुस्थानची सम्राज्ञी असा पुढे तिने किताब ही धारण केला.
1942 : जागतिक कीर्तीचे जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.
माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म पुणे शहरात झाला. माधव गाडगीळ हे निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, संस्कृतिप्रेमी असलेले जागतिक कीर्तीचे जीवशास्त्रज्ञ आहेत. गाडगीळ केंद्र शासनाच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन करण्यासाठीच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्याचा आराखडा बनवून स्वतंत्र पर्यावरण विभाग साकारला. जीवावरण संवर्धनासाठी ‘निलगिरी’ टेकड्या संरक्षित क्षेत्रासाठीचा प्रकल्प आराखडा गाडगीळांनी तयार केला.भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. त्यांना भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण, आय.सी.एस.एस.आर. तर्फे विक्रम साराभाई पुरस्कार आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार दिला.
1999 : पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन.
2000 : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
महत्वाच्या बातम्या :