1st June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 1 जून चे दिनविशेष.


जागतिक दूध दिन 


जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 


1998 : मराठी कादंबरीकार आणि कथा, चरित्रे, लघुनिबंध असे साहित्यप्रकार हाताळणारे सव्यसाची लेखक गो. नी. दांडेकर यांचे निधन. 


गो. नी. दांडेकर मराठी कादंबरीकार आणि कथा, चरित्रे, लघुनिबंध इ. अनेक साहित्यप्रकार हाताळणारे सव्यसाची लेखक होते. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याचा. धर्म, संस्कृती, पुराण, इतिहास इ. विविध विषयांवरील आणि कथा, कादंबरी, चरित्र इ. साहित्यप्रकारांतील त्यांचे लेखन आढळते. द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘साहित्यवाचस्पती’ ह्या पदवीने त्यांचा गौरव केला (1965). तळेगाव–दाभाडे नगरपालिकेतर्फे त्यांना ‘नगरभूषण’ म्हणून गौरविण्यात आले.


1929 : ‘प्रभात’ फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.


भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवणारी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती संस्था. प्रभात कंपनीची स्थापना 1 जून 1929 रोजी कोल्हापूर येथे झाली. विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. प्रभातने पहिल्या बोलपटाचे कथानक निवडले ते राजा हरिश्चंद्राचे. हा (अयोध्येचा राजा–1932) बोलपट पूर्ण करताना प्रभातला बऱ्याच अडचणींवर मात करावी लागली.


1945 : टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.


1929 : हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. 


नर्गिस दत्त यांचे मूळ नाव फातीमा रशिद. या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला. यांतील अनेक चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी काम केले. 1942 साली त्यांनी अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. 


1970 : हिंदी चित्रपट अभिनेते आर. माधवन यांचा जन्म.


आर. माधवन हा हिंदी चित्रपट अभिनेता आहे. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार आणि तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, तसेच इतर संस्थांकडून मान्यता आणि नामांकन मिळाले आहेत. भारतातील अशा काही अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याचे वर्णन केले गेले आहे ज्यांनी सात वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये दिसून भारतीय-अपील प्राप्त केले आहे. 2000 च्या दशकाच्या मध्यात, माधवनने राकेश ओमप्रकाश मेहराचा रंग दे बसंती (2006), मणिरत्नमचा बायोपिक गुरू (2007) आणि राजकुमार हिरानीचा 3 इडियट्स या तीन अत्यंत यशस्वी निर्मितीमध्ये काम केले आहे.


महत्वाच्या बातम्या :