31st May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 31 मे चे दिनविशेष.


जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.


हा दिवस 31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हा की जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी 1987 साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरविण्यात आला. परंतु, काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि 31 मे हा दिन निश्चित करण्यात आला. म्हणून 1988 सालापासून दर 31 मे रोजी 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' पाळण्यात येतो.


1970 : पेरू देशातील 7.9 तीव्रतेच्या भूकंपामुळे 70,000 च्या दरम्यान मारले गेले आणि 50,000 जण जखमी झाले.


1725 : महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. 


अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले. महेश्वर आणि इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक आणि परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.


1577 : साली मुघल शासक बादशाहा जहांगीर यांच्या पत्नी नूरजहाँ यांचा जन्मदिन.


1931 : साली नोबल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जॉन रॉबर्ट श्रीफर यांचा जन्मदिन.


1994 : साली हिंदुस्थानी संगीतातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबला वादक पंडित समता प्रसाद यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :