14th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 14 जून चे दिनविशेष.


14 जून : वटपौर्णिमा


हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. 


14 जून : कबीर जयंती  


कबीर दास हे भक्ती काळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते. समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीर यांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे. कबीर हे मार्मिक कवी असण्याबरोबरच उदारमतवादी समाजसुधारकही होते. एक प्रकारे, सार्थक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना त्यांनी बजावली असं म्हणता येईल.


1896 : महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

1896 साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलांसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ असे अनेक प्रकारचे मोठमोठाले उपक्रम सुरु झाले.


2001 : ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.


1967 : चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.


1789 : मक्यापासून पहिल्यांदाच ’व्हिस्की’ तयार करण्यात आली. तिला ’बोर्बोन’ असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील ’बोर्बोन’ येथील रहिवासी होता.


1916 : गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च आणि संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. 


1868 : साली नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ञ कार्ल लँडस्टीनर (Karl Landsteiner) यांचा जन्मदिन. रक्तगटाचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करून मुख्य रक्तगट ओळखले त्यांच्या या कामगिरी करता त्यांना नोबल पुरस्कार देण्यात आला.


1955 : साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायक, मनोरंजन निर्माता, टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्मदिन.


महत्वाच्या बातम्या :