7th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 जून चे दिनविशेष.
7 जून : जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day)
7 जून 2019 रोजी प्रथमच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. हे संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर 2018 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जनजागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणारा मृत्युदर कमी करणे हे या दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
इ.स. 1539 साली बक्सर च्या जवळ चौसा या ठिकाणी अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशाहा हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत बादशाहा हुमायू यांचा पराभव झाला.
सन 1975 साली क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषक करंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
1981 : हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म.
अमृता राव ही बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने विवाह, इश्क विश्क, मै हू ना, वेलकम टू सज्जनपूर अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. अमृता राव विवाह आणि इश्क विश्क या सिनेमांमुळे विशेष प्रकाशझोतात आली. तसेच तिला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
1978 : नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.
सन 1974 साली सुप्रसिद्ध भारतीय टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :