Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणरायाची पूजा आणि आराधना करण्याची प्रथा आहे. यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय.  


गणरायाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. बुद्धिचं दैवत असणाऱ्या आणि आपलं सर्व विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या 108 नावांचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतात, असं सांगण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला गणेशाची 108 नावं सांगणार आहोत. ज्यांचा मनापासून जप केल्याने गणपतीचा आशिर्वात प्राप्त होतो, असं सांगितलं जातं.


गणपतीची 108 नावं : 


1- बालगणपती 2- भालचन्द्र 3- बुद्धिनाथ 4- धूम्रवर्ण 5- एकाक्षर 6- एकदंत 7- गजकर्ण 8- गजानन 9- गजनान 10- गजवक्र 11- गजवक्त्र 12- गणाध्यक्ष 13- गणपती 14- गौरीसुत 15- लंबकर्ण 16- लंबोदर 17- महाबल 18- महागणपती 19- महेश्वर 20- मंगलमूर्ती 21- मूषकवाहन 22- निदीश्वरम 23- प्रथमेश्वर 24- शूपकर्ण 25- शुभम 26- सिद्धिदाता 27- सिद्धिविनायक 28- सुरेश्वरम 29- वक्रतुंड 30- अखूरथ 31- क्षेमंकरी 32- अमित 33- अनंतचिदरुपम 34- अवनीश 35- अविघ्न 36- भीम 37- भूपती 38- भुवनपती 39- बुद्धिप्रिय 40- बुद्धिविधाता 41- चतुर्भुज 42- देवदेव 43- देवांतकनाशकारी 44- देवव्रत 45- देवेन्द्राशिक 46- धार्मिक 47- दूर्जा 48- द्वैमातूर 49- एकदंष्ट्र 50- ईशानपुत्र 51- गदाधर 52- गणाध्यक्षिण 53- गुणिन 54- हरिद्र 55- हेरंब 56- कपिल 57- कवीश 58- कीर्ति 59- कृपाकर 60- कृष्णपिंगाक्ष 61- क्षेमंकरी 62- क्षिप्रा 63- मनोमय 64- मृत्युंजय 65- मूढाकरम 66- मुक्तिदायी 67- नादप्रतिष्ठित 68- नमस्तेतु 69- नंदन 70- पाषिण 71- पीतांबर 72- प्रमोद 73- पुरुष 74- रक्त 75- रुद्रप्रिय 76- सर्वदेवात्मन 77- सर्वसिद्धांत 78- सर्वात्मन 79- शांभवी 80- शशिवर्णम 81- शुभगुणकानन 82- श्वेता 83- सिद्धिप्रिय 84- स्कंदपूर्वज 85- सुमुख 86- स्वरुप 87- तरुण 88- उद्दण्ड 89- उमापुत्र 90- वरगणपति 91- वरप्रद 92- वरदविनायक 93- वीरगणपति 94- विद्यावारिधि 95- विघ्नहर 96- विघ्नहर्ता 97- विघ्नविनाशन 98- विघ्नराज 99- विघ्नराजेन्द्र 100- विघ्नविनाशाय 101- विघ्नेश्वर 102- विकट 103- विनायक 104- विश्वमुख 105- यज्ञकाय 106- यशस्कर 107- यशस्विन 108- योगाधिप. 


महत्वाच्या बातम्या :