SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांसाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 आहे. 


अधिकारी पदांसाठी जागा, जाणून घ्या


या भरती अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स या अधिकाऱ्यांच्या पदांसाठी 8 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये व्यवस्थापक (परफोर्मन्स, प्लानिंग आणि रिव्ह्यु) साठी 02 पदे, सल्लागार (फ्रॉड रिस्क) 04 पदे आणि वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) 02 पदे निश्चित करण्यात आली आहेत.


पात्रता जाणून घ्या


वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) : सांख्यिकी, गणितीय सांख्यिकी, गणितीय अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, अर्थमिती, सांख्यिकी आणि माहितीशास्त्र, उपयोजित संख्या आणि माहितीशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह किंवा एमबीए, पीजीडीएम 60% गुणांसह फायनान्सची पदवी, याशिवाय ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.


सल्लागार (फ्रॉड रिस्क) : उमेदवार पदवीधर आणि सेवानिवृत्त IPS किंवा राज्य पोलीस, CBI, इंटेलिजेंस ब्युरो किंवा CEIB अधिकारी असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवाराला 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


व्यवस्थापक (मॅनेजर) : पदवीधर असण्याव्यतिरिक्त, सेवानिवृत्त IPS किंवा राज्य पोलीस, CBI, इंटेलिजन्स ब्युरो किंवा CEIB अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात आणि उमेदवाराला 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


अर्जाची फी-
सामान्य, OBC, EWS उमेदवारांसाठी अर्ज आणि सूचना शुल्क (परतावा मिळणार नाही) रुपये 750 , तसेच SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.


वय श्रेणी


सल्लागार (फसवणूक, जोखीम विभाग) - 63 वर्षे.
वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) - 32 वर्षे.
व्यवस्थापक (परफोर्मन्स, प्लानिंग आणि रिव्ह्यु) - 25 ते 35 वर्षे.


निवड प्रक्रिया
वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) या पदांव्यतिरिक्त इतर पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. तर वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) पदासाठी निवड शॉर्टलिस्टिंगसह करण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :