Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर, इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., जालना या ठिकाणी विविध जागांसाठी भरती निघाली असून त्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा यांची माहिती सविस्तरपणे,
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे
पोस्ट - प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक
शैक्षणिक पात्रता - MD/DNB, M. Phil, पदव्युत्तर पदवी, BSc Nursing (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा – 16
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022
तपशील - mimhpune.org (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement & tenders मध्ये jobs वर क्लिक करा. सेंटर ऑफ एक्सलन्स योजने अंतर्गत संस्थेत 16 पदे कंत्राटी पध्दतीने भरणेबाबतची जाहिरात या लिंकमध्ये असलेली फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर
पोस्ट - आयटी विभाग प्रमुख, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, मायक्रो फायनान्स हेड फिल्ड एक्झिक्युटिव्ह, फिल्ड असोसिएट
शैक्षणिक पात्रता – आयटी विभाग प्रमुख पदासाठी MCA/MCM/B.E Computer, M.Sc., शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदासाठी GDC& A, मायक्रो फायनॅन्स हेड फिल्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठील पदवीधर, फिल्ड असोसिएट पदासाठी १२वी पास.
एकूण जागा – 11
अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512.
आणि ईमेल आयडी आहे. - maharashtranagaribank@gmail.com
नोकरीचं ठिकाण – लातूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., जालना
पोस्ट- अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
शैक्षणिक पात्रता – दहावी पास, ITI
एकूण जागा - 133
वयोमर्यादा – 18 ते 21 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधिकक्ष अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी मर्यादित, जालना मंडळ कार्यालय.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
तपशील - www.mahadiscom.in
इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL)
विविध पदांच्या 60 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड II
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 27
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
तपशील - engineersindia.com
दुसरी पोस्ट - ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड I
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 33
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
तपशील - engineersindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Applyint to EIL वर क्लिक करा. त्यात current openings वर क्लिक करा. Advertisement details वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या: