IFS Officer Recruitment : भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service) ही भारतीय परराष्ट्र मंत्रालय चालवण्यासाठी एक विशेष सेवा आहे. हे भारताबाहेरील कामकाजाचे व्यवस्थापन करते. IFS अधिकारी इतर देशांचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय भारतासोबत इतर देशांचे सांस्कृतिक संबंध वाढवणं ही IFS अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. हे एक अतिशय जबाबदारीचं पद आहे. जर तुम्हाला IFS अधिकारी व्हायचं असेल, तर खाली दिलेली माहिती नक्की वाचा.
IFS अधिकाऱ्याची निवड कशी होते?
IFS अधिकारी होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यावी लागते. नागरी सेवा परीक्षा UPSC द्वारे दिली जाते. परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच IAS, IPS आणि IFS स्तरावरील नोकऱ्या मिळू शकतात. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आणि तुमच्या पसंतीच्या आधारावरच तुम्हाला कोणत्याही सेवेत निवडलं जाऊ शकतं.
पात्रता काय असावी
IFS अधिकारी होण्यासाठी कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे. तुम्ही पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात असाल तर तुम्ही IFS अधिकाऱ्यासाठी पूर्व परीक्षा देऊ शकता. IFS अधिकारी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावं.
वेतनश्रेणी
आयएफएस ऑफिसरला (IFS Officer) सुरुवातीला 60 हजार ते अडीच लाखांपर्यंत पगार मिळतो. आयएफएस ऑफिसर्सचा पगार कॅटेगरी आणि रँकवरुन ठरवली जाते. परदेशात तैनात अधिकाऱ्यांचे पगार जास्त आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CPCL Recruitment 2022 : नोकरीची सुवर्णसंधी, मोठी भरती; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या शेवटची तारीख
- Job Majha : 'या' जागांसाठी होतेय थेट मुलाखत; दोन दिवस राहिलेत, घाई करा
- आयटीआयचं सर्टिफिकेट आहे? BARC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 266 पदांची भरती, लगेच करा अर्ज
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बंपर भरती; प्रतिमाह 1 लाख 75 हजार वेतन मिळवण्याची संधी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI