एक्स्प्लोर

Maharashtra Talathi Bharati 2023 : मोठी बातमी! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश

Maharashtra Talathi Bharati 2023 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Maharashtra Talathi Bharati 2023 : गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी (Talathi) पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आला असून, ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत. 

शिंदे-फडणवीस सरकराने एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आदेश काढले आहेत. या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येईल

जाहीर करण्यात आलेली तलाठी भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबवली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या-त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारार्थ घेतले जातील. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra Talathi : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रही तलाठीमुक्त होणार?; कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget