Pune Job Vacancy : पुण्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मिळणार नोकरीची संधी; पहिल्याच ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ला उत्तम प्रतिसाद
पुण्यातील पहिल्या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ मधून 52 पैकी 14 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. याच प्रकारे दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी पुण्यात‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ घेण्यात येणार आहे.
Pune Job Vacancy : पुण्यातील पहिल्या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ (job) मधून 52 पैकी 14 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे विशेष मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ला चांगला प्रतिसाद मिळाला. याच प्रकारे दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी पुण्यात‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ घेण्यात येणार आहे. यामार्फत अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.
रस्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे बुधवारी या‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चं आयोजन करण्यात आलं होतं. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. प्लेसमेंट ड्राईव्ह’ मध्ये जिल्ह्यातील 3 नामांकित उद्योगांना बोलवण्यात आलं होतं. या उद्योगांनी आपल्याकडील 358 रिक्त पदांची संख्या कळवून मागणी कळवली होती. कंपन्यांनी या ड्राईव्हमध्ये उपस्थित राहिलेल्या 52 बेरोजगार तरुण-तरुणींच्या मुलाखतीतून 14 उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड केली. त्यामुळे या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चा अनेक तरुणांना फायदा होणार असल्याचं चित्र आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी होणार ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’
तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते. सध्या अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात मात्र त्यासंदर्भातील माहिती प्रत्येकापर्यंत नीट (pune) पोहोचू शकत नाही. त्यामुळे पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चं आयोजन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी होणार ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या संधीचा तरुणांनी लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कशी कराल नोंदणी?
-पुणे जिल्ह्यातील नोकरी हव्या असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ आणि अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
-नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगिनमधून आपापल्या युझर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.
-उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डमधील 'पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर' या बटणावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील फर्स्ट प्लेसमेंट ड्राइव्ह-पुणे' या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
-उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.