Job Majha : पदविधरांसासाठी नोकरीची संधी! प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकसह विविध पदांवर भरती
Job Majha : पुणे स्मार्ट महाराष्ट्र, महावितरण वर्धा, मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि के.के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : नोकरीच्या सोधात असणाऱ्या तरूणांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. पुणे स्मार्ट महाराष्ट्र, महावितरण वर्धा, मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि के.के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
स्मार्ट महाराष्ट्र, पुणे
पोस्ट : पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, लेखापाल, अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, MIS आणि M&E अधिकारी, SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ज्ञ, ऑपरेटर, सांख्यिकी तज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदव्युत्तर पदवी आणि MBA
एकूण जागा : 173
नोकरीचं ठिकाण : पुणे
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे- ४११०१६
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022
तपशील : www.smart-mh.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. For Applications under SMART Project for various Contractual posts या लिंकमधली जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महावितरण, वर्धा
पोस्ट : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा)
शैक्षणिक पात्रता : NCVT प्रमाणपत्रासह १२वी पास
एकूण जागा : 34
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022
तपशील : www.mahadiscom.in
खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई
पोस्ट : यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 10
नोकरीचं ठिकाण : मुंबई, नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2022
तपशील - www.kvic.org.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. Engagement of Young Professionals on Contractual Basis या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
के.के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक
पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, कृषी सहाय्यक/माळी (शेती), ट्रॅक्टर चालक (शेतकरी)
शैक्षणिक पात्रता : M.Sc. Agriculture, MBA (मार्केटिंग), B.Sc. Agriculture, वाहन चालवण्याचा अनुभव (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा : 07
नोकरीचं ठिकाण : नाशिक
तुम्हाला अर्ज ईमेल करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी आहे. careeropportunities.agri@kkwagh.edu.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑगस्ट 2022
तपशील- agri.kkwagh.edu.in