(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
Job Majha : गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 277 जागांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2023 आहे.
Job Majha : गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 277 जागांसाठी भरती होत आहे. संपूर्ण देशभरात ही भरती होत असून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2023 आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
GAIL (गेल इंडिया लि.)
पोस्ट : वरिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 53
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com
पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (C&P)
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 32
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com
पोस्ट : वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 28
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com
पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (अग्नि आणि सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी, किमान 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 25
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com
पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (मानव संसाधन)
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी आणि 2 वर्ष MBA/MSW, किमान 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 24
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com
पोस्ट : वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग)
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी आणि MBA, किमान 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 23
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gailonline.com