Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. एअर इंडिया एअर सर्विसेस लि., दापोली अर्बन को-ऑप बँक लि., रत्नागिरी,कृष्णा सहकारी बँक लिमिटेड येथे नोकरीच्या संधी आहेत. 


एअर इंडिया एअर सर्विसेस लि.

विविध पदांसाठी एकूण ८६२ जागांवर भरती होत आहे.

पहिली पोस्ट - कस्टमर एजंट

शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर आणि १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा - ३३२

वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ९ मे २०२२

तपशील - www.aiasl.in

दुसरी पोस्ट - यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना

एकूण जागा - ३६

वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ मे २०२२

तपशील - www.aiasl.in

तिसरी पोस्ट - हँडीमन

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण

एकूण जागा - ४९४

वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत

मुलाखतीचं ठिकाण - एअर इंडिया स्टाफ हाऊसिंग कॉलनी, GST रोड, मिनामबक्कम, चेन्नई - ६०००२७

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ मे २०२२

तपशील - www.aiasl.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment वर क्लिक करा. Chennai Recruitment - Notification यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

दापोली अर्बन को-ऑप बँक लि., रत्नागिरी

पोस्ट - सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, आयटी अधिकारी, आयटी लिपिक

शैक्षणिक पात्रता - सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी M.Com/ M.A./ B.Com, ५ वर्षांचा अनुभव, वरिष्ठ अधिकारी पदासाठी B.Com/ B.A., ३ वर्षांचा अनुभव, आयटी अधिकारी पदासाठी पदवीधर, ५ वर्षांचा अनुभव, आयटी लिपिक पदासाठी पदवीधर, २ वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.

एकूण जागा - ६

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोली, वीर सावरकर रोड, पोस्ट लेन, जि. रत्नागिरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मे २०२२

तपशील- www.dapoliurbanbank.com

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड

पोस्ट - व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, वसुली अधिकारी, शाखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता - व्यवस्थापक पदासाठी C.A., आयटी व्यवस्थापक पदासाठी M.C.A./ B.E. कम्प्युटर सॉफ्टवेअर, वसुली अधिकारी पदासाठी B.Com./ LLB, शाखाधिकारी पदासाठी M.Com./ MBA ही पात्रता हवी.

एकूण जागा - ७

अर्ज तुम्ही ईमेल आयडीनेही पाठवू शकता. ईमेल आयडी आहे- headoffice@krishnabank.co.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता - कृष्णा सहकारी बँक लिमिटेड, मलकापूर कराड, कराड – ४१५ ५३९ , कृष्णा हॉस्पिटलजवळ, रेटारे बुद्रुक

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - ७ मे २०२२