ICMR Recruitment 2022 : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय रोग माहिती आणि संशोधन केंद्राने  (NCDIR -National Center for Disease Informatics and Research) संगणक प्रोग्रामरसह विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जारी केली आहे. या भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे. या पदांसाठी उमेदवारांची भरती ICMR-NCDIR मधील प्रकल्पांतर्गत तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीने केली जाईल. या भरती अंतर्गत एकूण 15 पदांची भरती केली जाणार आहे.


रिक्त जागा तपशील
प्रोजेक्ट सायंटिस्ट : 09 पद
प्रोजेक्ट अ‍ॅडमिन असिस्टंट : 01 पद
संगणक प्रोग्रामर : 03 पदे
प्रकल्प तांत्रिक अधिकारी : 01 जागा
प्रकल्प विभाग अधिकारी : 01 जागा


शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट (मेडिकल) या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये एक वर्षाचा संशोधन किंवा शिकवण्याचा अनुभव किंवा समुदाय कम्युनिटी मेडिसीन/मेडिसीन/बालरोग/पॅथॉलॉजी/OB Gyn/ या विषयातील अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार या संबंधित इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना पाहू शकतात.


कसा आणि कुठे कराल अर्ज?
इच्छुक उमेदवार या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी  http://www.ncdirindia.org या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. यानंतर पूर्ण भरलेला अर्ज पासपोर्ट आकाराच्या फोटोसह सर्व संबंधित प्रमाणपत्रे आणि अनुभवाच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह ICMR-NCDIR, बेंगळुरू येथे 09 मे 2022 पूर्वी ईमेलद्वारे (adm.ncdir@gov.in) पाठवावा. भरती संबंधित इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.


महत्त्वाच्या बातम्या :