Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. संपूर्ण देशभरात एकूण 3 हजार 614 अप्रेटिंस हवेत. यात मुंबईसाठी 200 जागा आहेत. गोव्यासाठी 15 जागा आहेत.


मुंबईतल्या 200 जागांसाठीची सविस्तर माहिती 


पोस्ट – अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह, ऑफिस असिस्टंट, कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स, लॅबरोटरी असिस्टंट, मेकॅनिक डिझेल, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सेक्रेटरिय़ल असिस्टंट या पोस्ट आहेत.


शैक्षणिक पात्रता – अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी वाणिज्य शाखेतून पदवीधर, ऑफिस असिस्टंट पदासाठी B.A./ B.B.A., इतर पदासाठी संबोंधित ट्रेडमध्ये ITI.


एकूण जागा – मुंबईसाठी 200 आहेत.


वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2022


तपशील - www.ongcindia.com    (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये recruitment notices वर क्लिक करा. 2022 वर क्लिक करा. Notification for engagement of appretince trainees – 2022 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


पाटबंधारे विभाग, अकोला


पोस्ट – कनिष्ठ अभियंता


निवृत्त अधिकारी हवेत.


एकूण जागा – 09


अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ, अकोला


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022


तपशील - wrd.maharashtra.gov.in   (या वेबसाईटवर गेल्यावर स्क्रोलिंगमध्ये जाहिरात -अकोला सिंचन मंडळ ,अकोला –जलसंपदा यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 


पोस्ट – विषय विशेषज्ञ (subject matter specialist)


शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, Ph.D.


एकूण जागा – 04


अर्ज पाठवण्याचा पत्ता - कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2022


तपशील -  www.pdkv.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)