MPSC Exam 2021 : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 (MPSC Exam 2021) साठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीच प्रवेश प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. उमेदवार अधितकृत संकेतस्थळ http://mpsconline.gov.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. परीक्षा केंद्रावर प्रवेश प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असेल. उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन प्रिंट केलेले प्रवेश प्रमाणपत्रसोबत आणणे अनिवार्य आहे.


महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 (MPSC Exam 2021) दिनांक 7, 8 आणि 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 






 


प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in आणि support-online@mpsc.gov.in  या ईमेलवर किंवा 1800 1234 274 किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक मदत मिळवू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI