Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलाने फायरमनसह अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत या भरतीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतील. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
 
जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत भारतीय नौदलात 127 पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे, ज्यामध्ये फार्मासिस्टची 1 पद, फायरमनची 120 पदं आणि पेस्ट कंट्रोल वर्करची 6 पदं निश्चित करण्यात आली आहेत. भारतीय नौदलातील या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतील.
 
या भरतीअंतर्गत अग्निशमन दलाच्या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड फिटनेस चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनुसार केली जाईल आणि फार्मासिस्ट पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 5 लेव्हल अंतर्गत दरमहा 29200 ते 92300 रुपये वेतन दिलं जाईल. तर अग्निशमन दलाच्या पदांसाठी 19900 ते 63200 रुपये आणि पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्याच्या पदांसाठी 18 हजार ते 56900 रुपये दरमहा वेतन दिलं जाणार आहे. 
 
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं. सर्व उमेदवारांना त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रं विहित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचनेद्वारे त्यांची पात्रता तपासली पाहिजे. दरम्यान, या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट  joinindiannavy.gov.in पाहू शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :