Indian Air Force मध्ये 327 पदांवर भरती; प्रतिमाहा लाखभर वेतन मिळवण्याची संधी, कसा कराल अर्ज?
Indian Air Force Recruitment 2023: तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी. भारतीय हवाई दलात अनेक पदांसाठी भरती आहे.
Indian Air Force Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात आहात? मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी. इंडियन एअरफोर्सनं (Indian Air Force) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन एअरफोर्सनं तब्बल 327 पदांवर भरती जाहीर केली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी अजिबात जाऊ देऊ नका. सर्व अटी-शर्थी जाणून घेऊन आजच अर्ज करा.
इंडियन एअरफोर्समध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज कुठे कराल?
इंडियन एअरफोर्समध्ये नोकरी मिळवण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट https://afcat.cdac.in/AFCAT/ वर क्लिक करा.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा
इंडियन एअरफोर्सनं जाहीर केलेल्या भरतीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी 1 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर शेवटची तारीख 30 डिसेंबर असल्याची माहिती भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिकृत अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.
किती पदांवर होणार भरती?
इंडियन एअरफोर्सच्या 327 पदांवर भरती केली जाणार आहे. यामार्फत फ्लाईंग, टेक्निकल, नॉन टेक्निकल, एन्ट्री आणि इतर डिपार्टमेंटमध्ये भरती केली जाईल.
वयोमर्यादा काय?
इंडियन एअरफोर्सच्या 327 पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय कमीत कमी 20 वर्ष असावं. तसेच, 24 वर्षांहून अधिक वयाचे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. परंतु, ग्राउंड ड्यूटी टेक्निकल पदांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल, तर तुम्हाला वयोमर्यादेत काही सूट दिली जाईल.
अर्जाची फी किती?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 250 रुपये भरावे लागतील. एनसीसी स्पेशल आणि मेट्रोलॉजी पदांसाठी अर्जासाठी शुल्कात सूट आहे.
किती पगार मिळेल?
या पदांवर भरतीसाठी, तुम्हाला 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
असा करा अर्ज
- एअर इंडियाची ऑफिशियल वेबसाईट https://afcat.cdac.in/AFCAT/ वर भेट द्या.
- मुख्य पानावर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल.
- तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये सर्व माहिती भरा.
- त्यासोबतच तिथे नमूद करण्यात आलेली आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करा.
- यानंतर पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करा.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.