एक्स्प्लोर

Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  

 Recruitment : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या मालकीच्या करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये विविध पदं मिळून एकूण 534 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

मुंबई : केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या विभागांमध्ये, बँकांमध्ये किंवा विविध संस्थांमध्ये नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या मालकचीच्या सिक्यूरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा भाग असलेल्या करन्सी नोट प्रेस नाशिकच्या सरकारी प्रेसमध्ये 534 जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 20 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येतील. 

कोणत्या प्रेसमध्ये किती जागांसाठी भरती?

करन्सी नोट प्रेस, नाशिकच्या (महाराष्ट्र)  करन्सी नोट प्रेस, नाशिक (CNPN), बँक नोट प्रेस, देवास (BNPD), इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक (ISPN) आणि सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद (SPPH) मध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिकमध्ये 279 जागा, करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये 124 जागा, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद (तेलंगणा) मध्ये 69 जागा आणि बँक नोट प्रेस, देवास मध्यप्रदेशमध्ये 62 जागा भरल्या जाणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज कुठं सादर करायचा? 

करन्सी नोट प्रेस, नाशिकच्या https://cnpnashik.spmcil.com  या वेबसाईटवरील करिअर पेजवर अर्ज दाखल करता येईल. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास 20 एप्रिलपासून सुरुवात होईल, तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 मे 2026 आहे. 

कोणत्या पदांसाठी भरती?

सुरक्षा अधिकारी,वेलफेअर ऑफिसर, सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल), सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन), सुपरवायझर (माहिती तंत्रज्ञान), सुपरवायझर टेक्निकल ऑपरेशन  मेकॅनिकल, सुपरवायझर टेक्निकल ऑपरेशन, सुपरवायझर टेक्निकल ऑपरेशन इलेक्ट्रिकल,  सुपरवायझर टेक्निकल ऑपरेशन इलेक्ट्रॉनिक्स, आर्टिस्ट ग्राफिक डिझाईन,  ज्यूनिअर ऑफिस असिस्टंटंट यासह इतर मिळून एकूण 21 पदांच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 124 जागा भरल्या जातील. 

परीक्षा शुल्क 

खुला प्रवर्ग, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असेल. तर, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 200 रुपये परीक्षा शुल्क असेल. 

पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा जी ऑनलाईन पद्धतीनं होईल. ज्या पदांसाठी टायपिंग आवश्यक असेल त्यांची टायपिगं टेस्ट घेतली जाईल. लेखी परीक्षेसाठी चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पहिल्या ऑनलाइन लेखी परीक्षेत किमान गुण मिळवणं आवश्यक आहे. खुल्या आणि इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 55 टक्के, ओबीसी उमेदवारांनी 50 आणि एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांनी  45 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 67 हजारांपासून पुढे पगार मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Success Story:  पतीचं आणि मुलीचं निधन, डोक्यावर दु:खाचा डोंगर, 15 वर्षानंतर शिक्षण सुरु केलं, अधिकारी होऊन दाखवलं, जिद्दीला सलाम
Success Story:  पतीचं आणि मुलीचं निधन, डोक्यावर दु:खाचा डोंगर, 15 वर्षानंतर शिक्षण सुरु केलं, अधिकारी होऊन दाखवलं, जिद्दीला सलाम
SBI ते रेल्वे! युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, 6 हजार 500 जागांवर भरती सुरु, काय आहे पात्रता? कुठे कसा कराल अर्ज?
SBI ते रेल्वे! युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, 6 हजार 500 जागांवर भरती सुरु, काय आहे पात्रता? कुठे कसा कराल अर्ज?

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget