Amazon Vacancy : अॅमेझॉनमध्ये नोकर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज, वाचा सविस्तर
Content Writer Job : अॅमेझॉनमध्ये कंटेट रायटिंग (Content Writing), प्रूफ रीडिंग (Proof Reading) या पदांवर नोकरीची संधी आहे.
Amazon Audible : अॅमेझॉनमध्ये (Amazon) नोकरीची सुवर्णसंधी (Vacancy) आहे. अॅमेझॉनमध्ये कंटेट रायटिंग (Content Writing), प्रूफ रीडिंग (Proof Reading) या पदांवर भरती करण्यात येणार आहे. अमेजॉन ऑडिबलकडून (Amazon Audible) ऑडियोबुक (Audiobook) आणि पॉडकास्ट (Podcast) मध्ये नोकर भरती करण्यात येत आहे. इंटरनेटद्वारे बातम्या आणि मनोरंजनाशी संबंधित ऑडिओ कंटेंट (Audio Content) तयार करण्यासाठीच्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराला लिहीण्याची समज आणि अनुभव असणं आवश्यक आहे. ही भरती चेन्नई, तामिळनाडूसाठी केली जाणार आहे.
अमेजॉन ऑडिबल काय आहे?
अमेजॉन ऑडिबल लोकप्रिय ई-कॉमर्स वेवसाईट अमेजॉनची कंपनी आहे. अमेजॉन ऑडिबल एक अॅप असून यामध्ये पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिक ऐकण्यासाठी उपलब्ध असतात. याशिवाय यावर पॉडकास्ट, टीव्ही आणि रेडिओ शोही ऐकता येतात.
पात्रता
- कोणतीही पदवीधर व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करु शकते.
- उमेदवाराला कंटेंट रायटिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे.
- प्रूफरीडिंग, कॉपी एडीटिंग आणि फॅक्ट-चेकिंग याचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
- उमेदवाराला डाटा बेस कॉन्सेप्ट (Excel Skills) माइक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
- इच्छुक उमेदवाराला सोशल मीडिया आणि इंटरनेट रिसर्च (Web Based Research Tools) टूल्स म्हणजेच गूगल (Google), गुडरीड्स (Goodreads) आणि एसईओ (SEO) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
- ऑनलाइन पुस्तकं, पॉडकास्ट, वेबसाइट, ब्लॉग आणि इतर डिजिटल कंटेट बाबतच्या मूलभूत गोष्टी आणि ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे.
काय काम करावं लागेल?
- सर्व Amazon Audible प्रोडक्टसबद्दल माहिती लिहीणे.
- प्रोडक्टस डिस्क्रिप्शन संबंधित तथ्यांची उलटतपासणी करणे आणि सर्व संबंधित माहितीचे प्रूफरीडिंग करणे.
- उत्पादनाची किंमत, विक्रीची तारीख, प्रादेशिक हक्क, रॉयल्टी कमावणारा, संबंधित Amazon ASIN कोड इ.चा रिव्ह्यू करणे.
असा करा अर्ज
तुम्ही Amazon Jobs पेजवर जाऊन किंवा https://bit.ly/3ddjGzT या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.