एक्स्प्लोर

Twitter आणि  Meta नंतर, Amazon मध्ये कर्मचारी कपात, कर्मचाऱ्यांना नोटीस; 10,000 लोकांच्या रोजगारावर होणार परिणाम

Amazon Layoffs : जागतिक मंदीच्या चर्चेमुळे ज्या टेक कंपन्या मोठ्या खर्चासाठी ओळखल्या जातात, त्या आता खर्चात कपात करताना दिसत आहेत.

Amazon Layoffs : आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत चढउतार पाहायला मिळत आहे. अमेरिका, युरोप या देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक कंपन्या सध्या तोट्यात आहेत. त्यामुळे कंपन्या आपला खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने (Amazon) 10,000 कर्मचारी (Employee) कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. Amazon च्या या घोषणेपूर्वी, मेटा (Meta), ट्विटर (Twitter), स्नॅप आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या इतर मोठ्या टेक कंपन्यांनी आधीच कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. अॅपलसारख्या कंपन्यांनीही नोकऱ्यांची संख्या कमी केली आहे. यापुढे मोठ्या टेक कंपन्या देखील भविष्यातील कठीण काळासाठी सज्ज असल्याचं बोललं जातंय. जागतिक मंदीच्या चर्चेमुळे ज्या टेक कंपन्या मोठ्या खर्चासाठी ओळखल्या जातात, त्या आता खर्चात कपात करताना दिसत आहेत.

कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली माहिती 

सुत्रांच्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीला ( Amazon.com Inc ) नुकसान सहन करावं लागतं आहे. ॲमेझॉन कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे कंपनी खर्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक कंपन्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे हार्डवेअर प्रमुख डेव्ह लिंप यांनी बुधवारी कर्मचार्‍यांना मेमो दिले, ज्यात लिहिले होते, "मला ही बातमी कळवताना खूप दु:ख होत आहे. कंपनी कर्मचार्‍यांना सूचित करत आहे की, आम्ही डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस विभागमधील प्रतिभावान Amazonian गमावणार आहोत..." तसेच कंपनी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार करत आहे. 

सर्वात मोठी कर्मचारी कपात

Amazon आपल्या कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी विभागातील सुमारे 10,000 लोकांना काढून टाकणार असल्याची बातमी सर्वप्रथम न्यूयॉर्क टाइम्सने दिली. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होत असल्याचं बोललं जातंय. या कर्मचारी कपातीचा परिणाम ॲमेझॉनच्या रिटेल, डिवायसेस आणि मानव संसाधन विभागांवर याचा मोठा परिणाम होईल. यापूर्वी ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्समध्ये ॲमेझॉनकडून मोठ्या प्रमाणावर खर्चात कशी कपात करण्यात येणार हे सांगण्यात आले होते. 

मेटाने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले
फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 9 नोव्हेंबर रोजी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या कपातीवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. टेक कंपन्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच हा साथीचा रोग संपल्यानंतरही याचा परिणाम होईल असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यामुळे आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget