IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: राहुल तपासे, एबीपी माझा | Updated at : 07 Feb 2021 06:16 PM (IST)
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील वहागाव या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल चार युवकांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या भागातील असल्याचं समोर आलेले आहे. अपघातग्रस्त वाहन स्विफ्ट गाडी असून या गाडीमध्ये एकूण पाचजण सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करत होते. ही स्विफ्ट गाडी कराड सोडून पुढे आल्यानंतर तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर ती कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली.
या अपघातात निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडकर या चौघांचा जागीचा मृत्यू झाला तर रोशन वरद हा थोडक्यात वाचला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही मुंबईच्या दिशेने जात असताना तिचा वेग हा जवळपास 160 असल्याचे स्पीडोमीटरच्या फोटो वरून दिसत आहे. ज्या वेळेला हा अपघात झाला त्या वेळेला स्पीडोमीटरही बंद पडले. या स्पीडोमीटरची नोंद पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान करून घेतलेली आहे.
वहागावच्या वळणावरून जाताना गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून विरूद्ध दिशेतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली. या वाहनाचे स्पीड 160 असल्यामुळे वाहन चालकाला आपल्या गाडीवरील ताबा मिळवता आला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हजर झाले आणि जखमीना गाडीतून बाहेर काढले. हा अपघात एवढा भीषण होता की या मृत झालेल्या चौघांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे झाले होते. अपघाताचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जखमीला कराड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित चौघांचे शवविच्छेदन करण्यासाठी शवागृहात नेण्यात आले आहे. आज रविवार असल्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा होत्या. त्यात हा अपघात झाल्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.
विधानभवनला राडा, गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांना भिडलेले नितीन देशमुख भाजपात; आव्हाडांची साथ सोडली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
बंडखोरांना रोखण्यात भाजपलाही अपयश, मुंबईत कोण कोणत्या प्रभागात नाराजांनी उगारलं बंडाचं निशाण
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
Parbhani : जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
Pune BJP : पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी