अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
निवडणूक
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 16 Jul 2020 10:30 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं आज (16 जुलै) निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 71 वर्षांच्या होत्या.
नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी झाला होता. त्यांच्या आईचं नाव सुशीला आणि वडिलांचं नाव वासुदेव आबाजी मांडके होत. ते पोलीस खात्यात होते. नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या 1965 साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी त्यांनी इंग्रजी वाङमय या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला.
सत्यनारायण या 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या पहिल्या निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरु केलं.
नीला सत्यनारायण कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी आणि तरल मनाच्या लेखिकाही होत्या. प्रशासनासोबतच लिखाणावरही त्यांची मजबूत पकड होती. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून 13 पुस्तकं लिहिली. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.
नीला सत्यनारायण यांची पुस्तके आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर) आयुष्य जगताना एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन) एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर) ओळखीची वाट (कवितासंग्रह) जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव) टाकीचे घाव डेल्टा १५ (प्रवासवर्णन) तिढा (कादंबरी) तुझ्याविना (कादंबरी) पुनर्भेट (अनुभवकथन) मी क्रांतिज्योती (अनुभवकथन) मैत्र (ललित लेख) रात्र वणव्याची (कादंबरी) सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)
Horoscope Today 16 May 2025: आजचा संकष्टी चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी भाग्यशाली? श्रीगणेशाची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमधील चर्चेचा तपशील समोर, एका गोष्टीवर दोघांची सहमती, जाणून घ्या काय ठरलं?
Operation Sindoor : भारतीय सैन्याचा विजयी जल्लोष तर पाकिस्तानी सैनिक खांदे पाडून उभे; रगणाड्यावर चढून शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचं हसू केलं
Teesta Prahar : चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारताचा 'तीस्ता प्रहार', धाडसी युद्धाभ्यासाने जग आचंबित
मी शब्दाचा पक्का, एखाद्याला खासदार करतो, तर कुणाला पाडायचं म्हटलं तर पाडतोच : अजित पवार
Virat Kohli : विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? रवि शास्त्री कोहलीसोबत झालेली चर्चा सांगत म्हणाले...
Thane Crime: मध्यरात्री पत्नी अन् मुलीला संपवत नवऱ्यानेही उचलले टोकाचे पाऊल; उल्हासनगरमध्ये अख्ख कुटुंब संपलं
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कंगनाची बोचरी टीका; जेपी नड्डांचा फोन येताच 'ट्विट क्विक डिलीट', पण स्क्रीनशॉट व्हायरल
Nuclear Bomb : अणुबॉम्ब कसा तयार करतात? कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते,अणवस्त्राचा वापर कसा करतात?