Top 10 Best Shows 2024: सरत्या वर्षात 'या' 10 वेब सीरीजनी OTT गाजवलं; पाचव्या क्रमांकावरची तर पुन्हा-पुन्हा पाहाल
Top 10 Best Shows 2024: भारतात परदेशी टीव्ही शो जास्त लोकप्रिय आहेत. रेटिंगच्या बाबतीत ते अव्वल स्थानावर आहेत. आम्ही तुम्हाला IMDB च्या लोकप्रिय शोबद्दल सांगणार आहोत, जाणून घेऊयात कोणते...?
Year Ender Top 10 Best Shows 2024: हल्ली दर महिन्याला नाहीतर, दररोज म्हटलं तरी नवनवे चित्रपट (Movies), वेब सीरिज (Web Series) आणि टेलिव्हिजन शो रिलीज होत असतात. रिलीजनंतर काही दिवसांत या सीरिज, चित्रपटांचं रेटिंग IMDb वर पाहायला मिळतं. तो चित्रपट किंवा सीरिज पाहून IMDb रेटिंग देत असते. अनेकजण चित्रपट, सीरिज पाहण्यापूर्वी IMDb वर जाऊन सर्वात आधी रेटिंग चेक करतात आणि त्यानंतरच तो पाहायचा की नाही ते ठरवतात. 2024 मध्ये असे अनेक लोकप्रिय चित्रपट आणि सीरिज आहेत, जे खूप पाहिले गेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांची यादी सांगणार आहोत, जे तुम्ही अजून पाहिले नसतील तर नक्की पाहा. हे सर्व चित्रपट आणि सीरिज रेटिंगच्या बाबतीत अव्वल स्थानी आहेत.
ट्रू डिटेक्टिव अव्वल स्थानी
ट्रू डिटेक्टिव्ह बऱ्याच काळापासून पहिल्या क्रमांकावर आहे. या शोचे चार सीझन आले आहेत आणि तो तुम्हाला इतका मोहून टाकतो की, तुम्ही दुसरं काहीही पाहण्यावर लक्ष केंद्रीत करत नाही. हा शो तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. तसेच, दुसऱ्या क्रमांकावर बॉईज आहे. या शोचे चार सीझनही झाले आहेत. ही कथा एका अमेरिकन सुपरहिरोची आहे. तुम्ही हे प्राईम व्हिडीओवर देखील पाहू शकता.
तिसऱ्या नंबरवर कोण?
तिसऱ्या नंबरवर द पेंगुइन, चौथ्या नंबरवर फॉलआउट आणि पाचव्या नंबरवर हाऊस ऑफ द ड्रॅगन आहे. या तिन्ही सीरिज फारच शानदार आहेत. या सीरिजचे अनेक सीझन्स आले आहेत आणि प्रत्येक सीझनला तेवढीच पसंती मिळाली आहे. हे सर्व शो तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
आठव्या नंबरवर कोणती सीरिज?
या लिस्टमध्ये सहाव्या नंबरवर शॉगन, सातव्या नंबरवर ब्रिजर्टन आणि आठव्या नंबरवर द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पावर आहे. याचे दोन सीझन्स आले आहेत. 2022 मध्ये जेव्हा याचा दुसरा सीझन आला, त्यावेळी लोकांना जणू याची भूरळ पडली होती. अनेकजण याचे दोन्ही सीझन रिपीट मोडवर पाहात आहेत. नवव्या नंबरवर द जेंटलमॅन आणि दहाव्या नंबरवर 3 बॉडी प्रॉब्लम आहे.